बाणेर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शना मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने भाजप कोथरुड उत्तर मंडलाने बाणेर- बालेवाडी- पाषाण – सुतारवाडी -सोमेश्वरवाडी – सुसगाव – महाळुंगे -औंध डिपी रोड भागासाठी तीन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
यामध्ये बालेवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सुतारवाडी पाषाण लिंक रोड येथील ना. चंद्रकांतदाद पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आणि सुसगाव येथील भैरवनाथ मंदिरात रक्तदान शिबीराचे नियोजन केले आहे. सकाळी १० ते रात्री १० यावेळेस सदर शिबीर होणार असून; जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांनी केले आहे.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी