November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील महिलांना सौ. पूनम विधाते यांच्या माध्यमातून शिवण आणि आरी वर्क प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप : आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल!

बाणेर :

पुणे महानगरपालिकेच्या वतीने, लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पूनम विधाते यांच्या माध्यमातून बाणेर येथील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवण क्लास आणि आरी वर्क क्लास प्रशिक्षण वर्गाचा यशस्वी समारोप झाला. या प्रसंगी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

हा केवळ एक प्रशिक्षण वर्ग नव्हता, तर महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांच्यातील स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रशिक्षणातून महिलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल

पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर)

या उपक्रमामुळे बाणेर परिसरातील महिलांमध्ये प्रचंड उत्साह असून, हे प्रशिक्षण त्यांच्या भविष्यासाठी एक नवी दिशा देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.