बाणेर :
बाणेर परिसरात मोतीलाल धूत इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत सुरू असलेल्या सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पादचाऱ्यांची गैरसोय आणि ड्रेनेज लाईनच्या कामातील दिरंगाई यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी साईट इंजिनीअर सचिन मोथे यांच्यासोबत समीर चांदेरे यांनी रस्त्याच्या कामाची आणि प्रलंबित फुटपाथच्या कामाची पाहणी केली. पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुटपाथचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, अंबर सोसायटी ते तीर्थ सोसायटीपर्यंतच्या नागरिकांना ड्रेनेज लाईनचे काम प्रलंबित असल्यामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत, उर्वरित ड्रेनेजचे काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम