August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी अग्निशामक केंद्र अखेर कार्यान्वित: नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

बाणेर :

पुणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी परिसरात उभारलेले अग्निशामक केंद्र अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या सहकार्याने हे केंद्र उभे राहिले असले, तरी अनेक वर्षांपासून ते बंद अवस्थेत होते.

 

या केंद्राच्या प्रत्यक्ष सुरुवातीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक ९ चे अध्यक्ष श्री. विशाल विधाते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे केंद्र आता सक्रियपणे कार्यरत झाले आहे.

या केंद्राच्या सुरुवातीमुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील आगीच्या घटना, अपघात आणि इतर आपत्कालीन परिस्थितींवर तातडीने प्रतिसाद देणे शक्य होणार आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्री. विशाल विधाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष श्री. नितीन सर कळमकर यांनी नुकतीच या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. हे अग्निशामक केंद्र केवळ एक सुविधा नसून, बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची एक मजबूत हमी ठरणार आहे.

 

You may have missed