पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत आज दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पौड येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. विठ्ठल व रुक्मिणीचे प्रतिमा पूजन व आरतीने करण्यात आली . वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी रिंगण सोहळा , पालखी सोहळा व विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात हा सोहळा पार पडला .
विठ्ठल रुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम संत मुक्ताबाई व इतर संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे आकर्षण ठरले.
ही शैक्षणिक दिंडी पौडमधील दिगंबरनाथ मंदिर व विठ्ठल मंदिर येथे नेण्यात आली. विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा, विठुरायाच्या गजर, जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा यामुळे शैक्षणिक दिंडी उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम तसेच संचालिका शिवानी बांदल मॅडम यांनीही वारीत सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले .
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका विणा कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेत्रा काकडे, प्राजक्ता वाघवले व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले.


More Stories
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*