बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन येथे आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. काईन्डनेस सेव्ह,नेशन ग्रोवस् असा सामाजिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
शाळेचे संस्थापक माननीय श्री राजेंद्र बांदल शाळेच्या डायरेक्टर सौ रेखा बांदल तसेच शाळेच्या डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सौ शुभदा कोलते यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षिका प्रज्ञा जोशी समन्वयक सायली गायकवाड आणि समन्वयक शिरीन काझी यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
सौ.कांचन मोरे, आणि वैशाली कुलकर्णी या शिक्षकांनी सर्व सजावट आणि विद्यार्थी शिस्त अगदी उत्तमरित्या केली.
कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या पादुका पूजनाने केली गेली, नंतर वाजत गाजत टाळ आणि मृदंगाच्या तालावर मुलांनी पालखी खांद्यावर घेत वारीचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि संतांनी समाजाला दिलेला माणुसकीचा संदेश आपल्या वक्तृत्व नृत्य गायन अशा कलाकृतीतून सादर केला.
प्राथमिक विभागामध्येही पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळील बापूजीबुवा मंदिरात नेण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले तसेच कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण निर्माण केले.
लहानग्यांनी कीर्तनातून सामाजिक संदेश देत एकतेचे महत्व अधोरेखित केले आणि एकतेच्या बळावरच देशाचा विकास व सुरक्षितता शक्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात शाळेच्या संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत “माऊली” या शब्दाचा अर्थ व महाराष्ट्राच्या संत परंपरेचे व वारी संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी सर्व लहान कीर्तनकारांचे मनापासून कौतुक केले.
हा पालखी सोहळा विद्यार्थ्यांसाठी एक अनमोल सांस्कृतिक अनुभव ठरला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभदा कोलते यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पहलगाम, पुलवामा आणि त्याआधी जगभरात झालेल्या अतिरेकी घटनांचे उदाहरण देत, माणुसकी, समता, एकता, शांतता या मूल्यांचा ऱ्हास होत आहे, तर आपण सर्वांनी जसे वारकरी संप्रदायातील लोक जात, धर्म हे भेद विसरून फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या ओढीने पाऊस वारा कशाचीही पर्वा न करता विठ्ठल नामाचा गजर करत पाई वारी करतात तोच भाव मनात ठेवून समाजाने भारताच्या रक्षणार्थ एकजुटीने राहण्याची गरज आहे असे म्हटले.
सध्या मुलांमधील वाढलेली चंचलता हिंसक वृत्ती यांना आळा घालण्यासाठी संतांची शिकवण व्यवहारात आणली पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले. पालखी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, ती एक आध्यात्मिक यात्रा, एक समाज शिक्षण, आणि एक मानवतेचा संदेश आहे. संतांची वारी, टाळ मृदंगाचा निनाद, एकोप्याचं दर्शन आणि मनुष्यत्वाचं स्मरण — हे सगळं पाळखीमध्ये अनुभवायला मिळतं
पालखी चालवूया भक्तीने, आणि राष्ट्र उभारूया माणुसकीने!”
“मानवता वाचवा, राष्ट्र वाचवा!” असा संकल्प आमच्या पेरिविंकल संस्थेच्या वतीने करण्यात आला.
संपूर्ण सोहळा शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या मदतीने शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात पार पडला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!