औंध :
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि रागा म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आषाढी अभंग रंग’ या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सुरेल कार्यक्रम शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे संपन्न होणार आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात उपस्थित भाविकांना आणि संगीतप्रेमींना अभंगांच्या माध्यमातून भक्तीरसात चिंब होण्याची संधी मिळणार आहे. विविध नामवंत कलाकारांच्या सुमधुर गायनाने ही सायंकाळ अविस्मरणीय ठरेल अशी अपेक्षा आहे.
कोथरूड विधानसभा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) कार्यध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी सर्व नागरिकांना अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे. भक्ती आणि संगीताचा हा अनोखा संगम अनुभवण्याची संधी सोडू नका !


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!