बाणेर :
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, औंध डीपी रोड, (सानेवाडी) पंचवटी, तसेच सुस आणि महाळुंगे हा कोथरूड उत्तर मंडळाचा भाग आहे. या भागातील मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे भाजपने मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी आघाडी मिळवली होती, तसेच या भागात २०१७ ला तीन नगरसेवकही निवडून आले होते.
माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या नेतृत्वाखालील मागील कार्यकारणीने केलेल्या चांगल्या कामामुळे आणि परिसरातील सर्वच स्थानिक नेत्यांच्या सहकार्यामुळे या भागात भाजपचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून येते.त्यात कार्यकर्ता ची संख्या जास्त असल्या मुळेच नवीन कार्यकारणी जाहीर करताना अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु, परिसरातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे हे काम सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करता यावी व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवण्याची जबाबदारी आता स्थानिक नेते,नवनियुक्त अध्यक्ष लहू बालवडकर आणि त्यांच्या कार्यकारणीवर असणार आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना या परिसरातून मिळालेले मताधिक्य पाहता, त्यांचे या भागाकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे कोथरूड उत्तर मंडळ भाजप कार्यकारणीवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना नवनियुक्त अध्यक्ष लहू बालवडकर म्हणाले, “आमच्या परिसरातील सर्व मान्यवर नेते मंडळी नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्याच्या भूमिकेत असल्याने, तसेच कार्यकर्त्यांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने आम्हाला मिळालेली जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पार पाडून संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने अधिक परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “भाजप पक्षामध्ये ‘राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः’ ही धारणा मनात धरून कार्यकर्ता काम करत असल्याने, मोठ्या समर्पित भावनेने सर्वच कार्यकर्ते, नवनियुक्त पदाधिकारी आणि नेते मंडळी यांच्या सहकार्याने, तसेच नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण मिळून संघटन शक्ती बळकट करून एक परिवार म्हणुन काम करणार आहोत, आणि सर्व परिसरातील नागरिकांची राहिलेली उर्वरित कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत याची खात्री मी यानिमित्त देत आहे.”
भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याने, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना सर्वच कार्यकारणी सदस्य आणि कार्यकर्ते पक्षाची शिस्त सांभाळत चांगल्या पद्धतीचे कार्य करतील, असे सध्याचे वातावरण दिसत आहे. कोथरूड उत्तर मंडळाची कार्यकारणी सध्या जाहीर झाली असून, इतर विविध आघाड्यांचे पद वाटप करत मोठी संघटन शक्ती निर्माण करण्याचा ध्यास या नवीन कार्यकारणीमध्ये दिसून येत आहे.
उत्तर मंडल मुख्य कार्यकारणी नियुक्तीपत्र देताना कोथरूड उत्तर मंडळ परिसरातील भाजपचे सर्वच सन्माननीय नेते उपस्थित होते, ज्यामुळे या कार्यक्रमात सर्वांचा समन्वय जाणवला. यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर,माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरूड उत्तर मंडलचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजप ओबीसी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बालवडकर, पुणे शहर चिटणीस राहुल कोकाटे यांची विशेष उपस्थिती होती.
भाजप नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादीत
सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, मोरेश्वर बालवडकर, निकिता माथाडे, कल्याणी टोकेकर, लखन कळमकर, मनोज दळवी, मंदार रारावीकर, मृणाल गायकवाड, नवनाथ ववले, लक्ष्मण मेघावत, वंदना सिंग, हेमंत कळमकर, सुजाता धनकुडे,स्मृती जैन, गोकुळ जाधव, सचिन सुतार, मीनाताई पारगावकर यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
सुस गावातील गणेशोत्सवात बाळासाहेब चांदेरे यांचा सहभाग; भाविकांना दिल्या शुभेच्छा…
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुटची अभिमानास्पद विजेती श्रावणी जाधव
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे आणि विधाते वस्ती परिसरात पूनम विधाते यांना आरतीचा मान, दिल्या गणेश भक्तांना शुभेच्छा..