पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी नव्या उत्साहाने साजरी करण्यात आली.पिरंगुट शाखेतील दिंडी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल–रुक्मिणीचे पूजन करून ग्रंथदिंडी काढत भक्तिमय वातावरण निर्माण केले. हा सोहळा फक्त धार्मिक नाही, तर एक अनोखा सामाजिक संदेश देणारा अनुभवदेखील होता.
दिंडीपूर्वी प्रांगणात सरस्वती माता व विठ्ठल–रुक्मिणींचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलनामाचा जयघोष करत विद्यार्थी आणि शिक्षक विठ्ठल–तुकोबाच्या अभंगांच्या तालावर भक्तिभावाने सहभागी झाले. “वृक्ष लावा–पृथ्वी वाचवा”, “प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी पुढे या” अशा पर्यावरण संदेशांनी दिंडी अधिक जीवनदायी आणि जागरुक बनवली.“ सोहळयामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी आयोजित करून ग्रंथपूजनही केले.
संस्थापक व संचालक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु.शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांच्या भक्ती आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेला बळ दिले.
“प्राचार्या आसावरी हंचाटे यांनी आषाढी एकादशीच्या दिंडीतून ‘भक्ती व पर्यावरण संस्कार एकाच प्रवाहात विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजणार आहेत,’ असा आत्मविश्वास दाखवला.” माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, आणि पूर्व‑प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली सोहळा सुव्यवस्थित पार पडला.
ऋग्वेद हाऊस शिक्षक व इतर शिक्षकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची सुरेख अंमलबजावणी झाली.या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना फक्त धार्मिक आणि सामाजिक बोध दिला नाही, तर आजच्या युगात पर्यावरण संवेदनशीलता व आपल्या कर्तव्याचाही संदेश दिला. शाळेच्या या उपक्रमातून “भक्तीसोबतच निसर्ग व स्वच्छता हीच खरी संपत्ती” या विचारातील संतुलन निर्माण करण्याचा भर दिला.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!