October 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस मध्ये कोहिनूर एमराल्ड सोसायटीत सौर ऊर्जा प्रकल्पाचे समीर चांदेरे यांच्या हस्ते उद्घाटन..

सुस :

सुस येथील कोहिनूर एमराल्ड को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये आज (शुक्रवार) सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे सोसायटीने स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोघांच्या हस्तेच या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे साहेब यांनी कोहिनूर एमराल्ड सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “सौर ऊर्जा हा आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी असे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनीही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात अशाच प्रकारे इतर सोसायट्यांनीही सौर ऊर्जा प्रकल्प राबवावेत, असे आवाहन केले.

याप्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीच्या ऊर्जा गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, तसेच पर्यावरणाचे रक्षणही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

 

You may have missed