बाणेर :
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बाणेर टेकडीवर वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि. (Urja Bio System Pvt Ltd) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. गजानन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी, प्रीमियर लॉजिस्टिक्सचे (Premier Logistics) अमोल बगडिया यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात एकूण १०० झाडे लावण्यात आली. वसुंधरा अभियानाच्या सदस्यांनी उपस्थितांना वृक्षारोपणासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती किरण गुडदे यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्वयंसेवक आणि सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रमुख पाहुणे गजानन पाटील यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती किरण गुडदे म्हणाल्या, “आजच्या युगात पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. वृक्षारोपण हा निसर्गाचे रक्षण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि राजाभाऊ गुडदे फाउंडेशनने हा उपक्रम राबवून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. भविष्यासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे.”



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले