महाळुंगे :
‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ या उद्दिष्टाला अनुसरून, महाळुंगे येथील कुल इकोलोज सोसायटीमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा पूनम विशाल विधाते यांच्या वतीने डस्टबिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे सोसायटी परिसरातील स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
यावेळी पूनम विधाते यांनी सांगितले की, “साफसफाई आणि स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”
‘स्वच्छ, सुंदर म्हाळुंगे… आपल्याच हातून घडवूया!’ या आवाहनासह, नागरिकांनी या सुविधेचा वापर करून परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही सौ पूनम विधाते यांच्या कडून करण्यात आले आहे.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*