July 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये ज्योती कळमकर आयोजीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा: नागरिकांनी घेतला योगासनांचा आनंद!

बाणेर :

‘निरोगी आरोग्यासाठी योगासने ही गुरुकिल्ली’ या संदेशासह आज बाणेर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजप सरचिटणीस गणेश कळमकर यांच्या माध्यमातून एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बाणेरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगासनांचा मनसोसोक्त आनंद लुटला.

 

यावेळी योगगुरू लोगनाथ उडेयार यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. त्यांनी योगासनांचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे समजावून सांगितले. नागरिकांनीही उत्साहाने योगासने करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी सर्व उपस्थित नागरिकांचे आभार मानले. ते म्हणाले, “योगदिनानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाचे धडे गिरवत आरोग्य संपदा टिकवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”

या शिबिराला छायाताई गद्रे, हेमंत नवरंगे, राशीणकर, अस्मिता करंदीकर, संदीप वाडकर, महादेव सायकर, निकिता माताडे, मृणाल मराठे, स्मृती जैन, उज्वला साबळे, वैदही बापट, सुधीर ताम्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या शिबिरामुळे नागरिकांमध्ये योगाभ्यासाविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.