July 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेतील पेरीविंकल इंग्लिश मिडीयम शाळेमधील विद्यार्थ्यांनी गिरवले योगसाधनेचे संगीतमय धडे!!!!

योग साधना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली-
आंतरराष्ट्रीय योग दिनाद्वारे संस्थापक श्री राजेन्द्रजी बांदल यांचे प्रतिपादन.

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत आज दिनांक: २१ जून २०२५ , शनिवार रोजी विद्यार्थ्यांनी योग दिनाचे महत्त्व जाणून घेतले आणि म्युझिक डे असल्यामुळे त्या दोघांचा सहसंबंध आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा असतो हे जाणून योग प्राणायाम व संगीत याचा मिलाप गाठून संगीत योग सहज प्राणायामाचे धडे गिरवले. योगाची शक्ती शरीर आणि मन निरोगी करण्याचा एक मार्ग आहे हे जाणून घेवून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना योगा ट्रेनर यांनी योगाचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे फायदे आणि योगाद्वारे निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला.

 

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय म्युझिक दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्ताने पेरीविंकल च्या सूस शाखेत दोन्ही दिवसाचे एकत्रित असणारा सहसंबंध जाणून घेवून विद्यार्थ्यांना याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित तसेच योग प्रशिक्षक निधी गोयल व प्रिया जैन (महाराष्ट्र येथील एक समर्पित आणि उत्साही योग प्रशिक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.

योग दिनाच्या निमित्ताने योग प्रतिज्ञा घेऊन सर्व मान्यवरांसमवेत विद्यार्थी व शिक्षवृंद यांच्या सह योगासने करून आज पासून रोज सकाळी ही योगसाधना आचरणात आणण्याचा संकल्प आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी केला.
पारंपारिक योग पद्धतींची समृद्ध पार्श्वभूमी आणि अर्हम ध्यान योगामध्ये प्रमाणपत्र असलेल्या योग प्रशिक्षकांनी आरोग्य आणि निरोगीपणासाठी एक समग्र आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन आणून शारीरिक आसनांना जागरूक श्वास तंत्रांसह एकत्रित करण्यासाठी करावयाची प्राणायाम मुद्रा व आसने याचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थी व शिक्षकांकडून करून घेतले ज्यामुळे एक संतुलित आणि उपचारात्मक अनुभव निर्माण होतो.
प्रिया जैन या प्रमाणित योग प्रशिक्षक असून त्यांनी एमबीए व अ‍ॅबॅकस आणि वैदिक गणित शिक्षक म्हणून यांची ख्याती आहे. योग शिक्षण आणि निरोगीपणा याची सांगड व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे त्यांनी अतिशय सहज पणे त्यांच्या प्रात्यक्षिकाद्वारे विस्तारितपणे सांगितली. तसेच योगप्रशिक्षकांनी वॉर्म-अप, शांतता मुद्रा ,त्रिकोणी मुद्रासन ,अहम नमः मुद्रासन, भस्त्रिका प्राणायाम अशा प्रकारचे योगासने घेतले. योगा केल्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात ते सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले .

संस्थेच्या डायरेक्टर शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना दररोज योगा केला पाहिजे आणि योग मुळे होणारे फायदे तसेच योग शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य सुधारण्यात कसे मदत करतात असे सर्वांना सांगून दररोज योगसाधना करण्याचे आवाहन केले.

योग दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे झुंबा डान्स घेण्यात आला. सर्व विद्यार्थी अतिशय उत्साही होते. योग दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी योगसाधनेमुळे आत्मा-साक्षात्कार होऊन शांती आणि आरोग्य याचे संतुलन होउन आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद याचा अनुभव येतो असे सांगून योग साधनेमुळे पचन क्रिया सुधारते आणि व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहते हे स्पष्ट करून योग मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि व्यक्तीला आजारपणातून मुक्तता मिळते व या सगळ्यामुळे अभ्यासात व कामात एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते असे सांगून रोज १० मिनिट तरी प्राणायाम आणि योगसाधना जर प्रत्येकाने केली तर नक्कीच सुदृढ व निरोगी जीवन उत्साहवर्धक होण्यास मदत होईल असे सांगितले.

या योगा दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे सर्वांना कायम पाठिंबा असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या पर्यवेक्षिका स्मिता श्रीवास्तव, नेहा माळवदे,सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच रेड हाऊस सिंहगड वॉरियर्स या टीमच्या मदतीने करण्यात आले होते. तसेच सर्व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांचा सहभाग या त्रिवेणी संगमाने आजचा हा योगदानाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी वैष्णवी सुतार आणि तनिष्का वाकळे यांनी उत्तमरीत्या व उस्फूर्तपणे केले.