August 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे- बालेवाडी येथे ‘योग करूया, निरोगी राहूया’ अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित योग दिनानिमित्त २५०० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

महाळुंगे-बालेवाडी :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुणे शहरातील सर्वात मोठ्या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला, ज्यात सुमारे २५०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी भोर वेल्हा मुळशी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी उपस्थित राहून नागरिकांचा उत्साह वाढविला.

 

यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करण्यात आली. योग जीवनासाठी किती महत्त्वाचा आहे आणि निरोगी आरोग्यासाठी त्याचे काय फायदे आहेत, याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

या महत्त्वपूर्ण उपक्रमात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरासह पुणे शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली आणि योगाभ्यास केला. आयोजक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त केले.

यावेळ क्रीडा विभागाचे वसंतराय मोरे, सुहास पाटील, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, नवचैतन्य हास्य योग परिवार, वसुंधरा अभियान बाणेर, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, भाजपा पदाधिकारी आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.