August 11, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

 “योग करूया, निरोगी बनुया” या संदेशाने पिरंगुट येथील पेरिविंकल शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 

पिरंगुट :

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती, महर्षी पतंजली आणि योगसाधनेला पुढे नेणारे गुरु बी के अय्यंगार यांच्या पूजनाने झाली.

 

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल, तसेच प्राचार्या सौ. आसावऱी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले

योग मनाला जागृत करतो” या घोषवाक्याला अनुसरून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार,योगासने, प्राणायाम व ध्यान सादर केले. योगाचे महत्त्व, फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयोग यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून योग दिनाच्या निमित्ताने “सक्षम मन आणि आरोग्यदायी शरीर” ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे ही आयोजन करण्यात आले. यामध्येही विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकल व समूहगीते सादर केली.

या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका कु.शिवानी बांदल यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना ध्यान व नियमित योगाभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमात क्रीडाशिक्षक हनुमंत मनेरे , प्रवीण मोरे, आकांक्षा पाटील व सामवेद हाऊसच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी आसने सादर केली .कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.