July 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, बावधन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे आज **आंतरराष्ट्रीय योग दिन** अत्यंत उत्साहात आणि ऊर्जा भरलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये योगाचे महत्त्व रुजविणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार व प्रसार करणे हे होते.

या कार्यक्रमासाठी **श्री. शंकरराव जनार्दन आवाळे (डिप्लोमा इन योग व आयुर्वेद, योग शिक्षक, टिळक महाराष्ट्र विद्यालय, पुणे) आणि श्री. संदीप ढमढेरे सर, उद्योजक यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी यावर्षीची योग दिनाची थीम **”स्वतःसाठी आणि समाजासाठी योग”** या संदेशावर विशेष प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर श्री. आवाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे अध्यक्ष, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव केला. त्यांनी उपस्थितान्ना जलनीति, रबर नीति याचे प्रात्यक्षिक देखिल दाखवले.यावेळी योग क्रियेचे फायदे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले, ज्यामुळे योगामुळे मिळणारे शारीरिक आणि मानसिक लाभ उपस्थितांच्या मनावर ठसले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखिल चक्रासन, वक्रासन, शीर्षासन, धनुरासन असे विविध प्रकार सादर करून दाखवले.

शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सामूहिक योग सत्रात सर्व वर्गातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री राजेंद्र बांदल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, **”योग हे केवळ शरीरासाठी नाही, तर मन आणि आत्म्याच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. योग शरीर आणि आत्मा यांचा संगम घड़वून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. योग हा यशस्वी जीवनाचा प्रभावी मार्ग आहे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभदा कोलते यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा जोशी, सौ. शिरीन काझी आणि विभाग प्रमुख कु. सायली गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचा समारोप **”दररोज योग करा आणि योगाचा प्रसार करा”** या संकल्पाने करण्यात आला.

या उत्सवातून शाळेची विद्यार्थी-हित आणि सर्वांगीण विकासासाठी असलेली बांधिलकी अधोरेखित झाली, तसेच भारताच्या प्राचीन योग परंपरेचे जागतिक महत्व सर्वांना प्रकर्षाने जाणवले.