August 12, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्यांवर हभप संजय बालवडकर यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, वारकऱ्यांचा जल्लोष!

पुणे :

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर आज (शुक्रवारी) सायंकाळी बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर यांच्याकडून संचेती रुग्णालया जवळील चौकात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या नयनरम्य दृश्याने वारकरी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला.

 

सायंकाळच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती चौकात पोहोचताच बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर यांच्याकडून ही पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे येताच तिच्यावरही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत भव्य स्वागत केले.

यावेळी आमदार शंकरभाऊ मांडेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कदम (छोटे), भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, सीईओ ज्ञानेश्वर वीर, राहुलदादा बालवडकर व निखिल बालवडकर यांच्या वतीनेही पुष्पवृष्टी करण्यात आली.

हभप संजय बालवडकर म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर आमची निस्सीम श्रद्धा आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत आहोत. दोन्ही पालख्यांच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर आम्ही आमची ही सेवा संतांच्या चरणी रुजू केली.” दोन्ही पालख्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्यावर संचेती रुग्णालयाजवळील संपूर्ण वातावरण उत्साहाने भारले होते.

 

You may have missed