July 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे येथील शितळा देवी नगर आणि मेट्रो जॅझ सोसायटीमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; सौ पुनम विधाते यांच्या मदतकार्यामुळे नागरिकांना दिलासा…

महाळुंगे :

काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महाळुंगे येथील शितळा देवी नगर आणि मेट्रो जॅझ सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरात आणि पार्किंगमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेची माहिती मिळताच, भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या सूचनेनुसार आणि पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा पुनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

 

शितळा देवी नगरमध्ये तातडीच्या उपाययोजना:
शितळा देवी नगर येथे काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच, पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने काम केले.

मेट्रो जॅझ सोसायटीमध्ये विधाते यांच्याकडून पाहणी आणि मदत:
काल सकाळी मेट्रो जॅझ सोसायटीमध्येही अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये आणि पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर यांच्या सूचनेनुसार आणि पुनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. पुनम विधाते यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पार्किंगमधील गाड्या पाण्याखाली गेल्या असून, पाणी जाण्याचे सर्व मार्ग ब्लॉक झाल्याचे त्यांनी यावेळी पाहिले.

“नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. संकटाच्या काळात मी आणि माझी टीम आपल्यासोबत खंबीरपणे उभी आहे,” असे म्हणत पुनम विशाल विधाते यांनी नागरिकांना धीर दिला आणि मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

You may have missed