July 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर* कॉलेज मध्ये फादर्स डे निमित्त अर्थपूर्ण आगळावेगळा उपक्रमाचे आयोजन !!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये फादर्स डे निमित्त, आपल्याला आपल्या वडिलांचे प्रेम, मार्गदर्शन आणि आधार यांचे कौतुक करण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळते.

 

या विशेष दिनानिमित्त पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज* तर्फे विद्यार्थ्यांसाठी एक अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या वडिलांच्या आयुष्यातील मोलाच्या भूमिकेचा सन्मान करतील.

सोमवार दिनांक: १६ जून, २०२५ विद्यार्थ्यांनी वडिलांमधील त्यांना आवडणारा एक गुण किंवा वडिलांकडून शिकावासा वाटणारा एखादा गुण याविषयी ग्रीटिंग कार्ड तयार करण्यास सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या वडिलांविषयी असणारे प्रेम व त्यांनी दिलेली शिकवण व्यक्त केली.

फादर्स डे निमित्त मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे वेळोवेळी मोलाचे योगदान असतेच तसेच हे करत असताना प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद यांचा देखील सहभाग होता.प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता

या फादर्स डे उपक्रमाचे आयोजन कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अभ्यासपूर्ण नेतृत्व व अचूक नियोजनाने पर्यवेक्षिका नेहा माळवदे , स्मिता श्रीवास्तव, सचिन खोडके यांच्या सहकार्याने व सर्व विषयशिक्षक या सर्वांच्या जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांचा परिपूर्ण सहभाग याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.