बवधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्री-प्रायमरी विभागात पितृ दिनाचा आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे वडील सहभागी झाले होते. वडिलांनी आपल्या मुलांसोबत खेळ खेळले, छान वेळ घालवला आणि शाळेतील या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमानंतर वडिलांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेने अशा प्रकारचे आयोजन केल्याबद्दल सकारात्मक अभिप्राय दिला.
शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्री-प्रायमरी पर्यवेक्षक श्रीमती शिरीन काझी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. त्याचबरोबर प्रि प्रायमरी च्या सर्व शिक्षकांनी स्वतःची सर्जनशीलता दाखवून खूप सुंदर सजावट केली होती.
तसा वडिलांसाठी कोणताही एक दिवस नसतो तर आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा त्यांच्या मुळेच असतो. पण वडील – मुल यांच्या मधील प्रेम, आपुलकी अन् माया व्यक्त करण्यासाठी आम्ही पेरिविंकल शाळेने फक्त एका दुव्याचे काम केले.
हा विशेष दिवस प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी अविस्मरणीय ठरला.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!