औंध :
पावसाळ्याच्या दिवसांत गोरगरीब भगिनींना दिलासा देण्यासाठी औंध प्रभागात भाजप सदस्य श्री सचिन मानवतकर यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
श्री सचिन मानवतकर यांनी स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन छत्र्यांचे वाटप केले. यावेळी त्यांनी विशेषतः अशा महिलांना प्राधान्य दिले जे कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी दररोज चार घरांमध्ये कामासाठी पावसात भिजत जातात.
या प्रसंगी बोलताना श्री मानवतकर म्हणाले, “ज्यावेळी मी माझ्या माय माऊलींच्या हातात छत्री देत होतो, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान मला खूप काही सांगून गेले.”
या उपक्रमामुळे पावसाळ्यात कष्टकरी महिलांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*