बालेवाडी :
पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आज बालेवाडी येथील सर्वे नं. १२/०५, पॅलाडियम सोसायटीजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री आणि मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर व भाजपा सदस्य प्रियंका शिवम बालवडकर यांच्या माध्यमातून हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू आण्णा बालवडकर, वैशालीताई कमाजदार, बालाजी मुळे, दीपक बोडके, निरंजन बालवडकर, कृष्णा तिथे, मीनाताई पारगावकर, तसेच सोसायटी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने, मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने हा उपक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमादरम्यान, परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, जो आयोजकांसाठी मोठा आधार ठरला. उपस्थितांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल शिवम बालवडकर यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी शिवम बालवडकर सांगितले की, “आपण फक्त झाड लावत नाही, तर भविष्यातील श्वास सुरक्षित करत आहोत. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे आणि ती आपण सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारली आहे.” भविष्यात अशाच उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक वृक्षारोपण करून परिसर सुसज्ज व हरित ठेवण्याचे आपले ध्येय आहे.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले