बालेवाडी :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर आणि बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये ‘आपुलकी संवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राहुल दादा बालवडकर यांनी विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या आपुलकीच्या भेटीदरम्यान, राहुल दादा यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, या उपक्रमाचा एक भाग म्हणून, उपस्थित नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी छत्र्या भेट देण्यात आल्या.
राहुल दादा बालवडकर हे नागरिकांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सातत्याने विविध सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या ‘आपुलकी संवाद अभियाना’मुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून, राहुल दादा यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल दादा बालवडकर यांनी नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी