सूस :
सूस गावातील रहिवासी आणि नुकतेच पोस्टमन पदावरून सेवानिवृत्त झालेले नंदकिशोर बाळू पारखी यांचा सेवापूर्तीनिमित्त स्नेहभोजन व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात मिळालेल्या सर्वांच्या उत्तम सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अनेक मान्यवर, विविध क्षेत्रांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये आमदार शंकर भाऊ मांडेकर, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी रजिस्टर नामदेव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेवक सनी निम्हण, विशाल विधाते, भाजपा नेते सचिन दळवी, जयेश मुरकुटे, माजी सरपंच नारायण चांदेरे, बालम सुतार, नाना ससार, नितीन मामा चांदेरे, सुखदेव चांदेरे, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास पानसरे, स्वाती ढमाले, राम गायकवाड, शरद भोते, गोवर्धन बांदल, माणिक तात्या गांधीले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याव्यतिरिक्त, सीआयडी कर्मचारी व अधिकारी, ग्रामीण पोलीस कर्मचारी व अधिकारी, पोलीस वायरलेस अधिकारी आणि पोस्टल विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून नंदकिशोर पारखी यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नंदकिशोर पारखी यांनी पोस्टमन म्हणून केलेल्या निस्वार्थ आणि समर्पित सेवेबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सर्वांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य व आनंदाची सदिच्छा व्यक्त केली. हा कार्यक्रम पारखी यांच्या सेवेचा गौरव करणारा आणि त्यांच्या सामाजिक संबंधांचे दर्शन घडवणारा ठरला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले