November 21, 2024

Samrajya Ladha

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची तपासणी मोहीम राबविणार : मंत्री उदय सामंत

मुंबई :

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चूनही शिक्षकांची कमी, स्वच्छतागृहांचा प्रश्न, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने, विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न असे अतिशय गंभीर प्रश्न आहे. शाळांना अचानक भेटी देऊन हे प्रश्न समजावून घेण्याची गरज आहे आणि त्यावर त्वरित तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत आमदार माधुरी मिसाळ यांनी पुणे महापालिकेच्या शाळांच्या समस्यांबद्दल लक्षवेधी सूचना मांडली.

यास उत्तर देताना पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या एकूण 272 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी मराठी माध्यमाच्या 185, उर्दू माध्यमाच्या 33, इंग्रजी माध्यमाच्या 52 व कन्नड माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण शिक्षकांची मंजूर पदे 2,425 असून त्यामधील 352 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येतील. ज्या शाळांमध्ये मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह नाहीत. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय केळकर यांनी सहभाग घेतला.
https://twitter.com/madhurimisal/status/1687354823447080960?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1687354823447080960%7Ctwgr%5Ed7a93d1ce5d162465be5078290da6539b311d509%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F