May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

लिटल मिलेनियम प्रीस्कूल आणि डेकेअर बालेवाडी व पिंपळे सौदागर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून लहान मुलांनी उलगडले नात्यांचे महत्व

बालेवाडी/पिंपळे सौदागर :

लिटल मिलेनियम प्रीस्कूल आणि डेकेअर, बालेवाडी आणि पिंपळे सौदागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहान मुलांच्या भावविश्वात नात्यांचे महत्व विशद करणारा हा कार्यक्रम ‘ईश्वर, कुटुंब आणि राष्ट्राशी नाते’ या संकल्पनेवर आधारित होता.

 

कार्यक्रमाची सुरुवात ‘देवाशी नाते’ दर्शवणाऱ्या आकर्षक गणपती तालनृत्याने झाली. यानंतर, बंधुप्रेम आणि त्याग या मूल्यांवर आधारित ‘राम भरत मिलाप’ ही हृदयस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली, ज्याने उपस्थितांना राम नामाच्या जयघोषात तल्लीन करून टाकले.

कौटुंबिक नात्यांची महती सांगणारे विविध मनमोहक नृत्य आणि एकांकिका सादर झाली, ज्याने सभागृहात उपस्थित असलेल्या सुमारे ७५० प्रेक्षकांना भावूक केले. यानंतर, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ (२०१९) या घटनेवर आधारित एक भावनिक नाट्य व नृत्य सादर करण्यात आले. या प्रस्तुतीमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

२२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा रोमांचक आणि विचारप्रवर्तक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मार्गदर्शक गणेश कानडे आणि सौ. हेमलता कानडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

शाळेच्या संचालिका सौ. हेमलता कानडे आणि गणेश कानडे यांनी या कार्यक्रमाची उत्कृष्ट रचना केली होती, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना नात्यांचे महत्त्व समजावून सांगणारा हा कार्यक्रम निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.