May 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन रमझान महिन्यात केले जाते. यावर्षी बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप साहेब, बाणेर पोलिस वाहतूक विभागाचे प्रमुख श्री पठाण साहेब, त्यांचे सहकारी, सर्व पत्रकार बंधु आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास कामत, शकिल सलाती, यश चौधरी, रमेश रोकडे, दफेदार सिंह, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, ॲड. माशाळकर, ॲड. इंद्रजित कुलकर्णी, शुभांगी इंगवले, योगेंद्र सिंग, आशिष कोटमकर, डॉ. सुधीर निखारे, ओमप्रकाश वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.