May 12, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्याची ज्योती कळमकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

बाणेर :

बाणेर-बालेवाडी भागातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बालेवाडी (पुणे) येथील केबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सर्वे क्रमांक ४ मधील विद्युत विभागाला दिलेल्या जागेत विद्युत उपकेंद्राचे (सबस्टेशन) काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

मुंबईतील विधान भवन येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी ऊर्जा प्रकल्पाबाबत आढावा घेतला. यावेळी विविध ऊर्जा प्रकल्पांबरोबरच पुण्यातील बालेवाडी उपकेंद्राच्या प्रलंबित कामावरही चर्चा झाली. फडणवीस यांनी महावितरण विभागाला या उपकेंद्राच्या कामासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

“बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे उपकेंद्र तातडीने सुरू होणे आवश्यक आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्र देत मागणी केली.” असे माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले.

“मुख्यमंत्र्यांनी बाणेर बालेवाडी वीज समस्यांचे महत्व लक्षात घेत आपल्या मागणीची तातडीने दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे येत्या काही काळात ही समस्या सुटेल,माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार ” – गणेश कळमकर (सरचिटणीस भाजपा पुणे शहर)