May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

बाणेर :

कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांत दादा आणि श्री राजेश जी पांडे यांच्या समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून “श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन निमित्त” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज प्रथमेश पार्क बाणेर परिसरात सौ कल्याणी टोकेकर, सौ निकिता माताडे, आणि श्री सुभाष भोळ या भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आले.

 

या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि दोनशेहून अधिक जणांनी विविध मेडिकल टेस्ट करून घेतल्या.

रक्तातील विविध घटक चाचण्या, साखरेची पातळी, कॉलेस्ट्रॉल प्रमाण, रक्तदाब, दात सफाई, सिमेंट भरणे, स्त्रियांसाठी स्तन कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, मोतीबिंदू काचबिंदू चाचणी आणि गरजूंना मोफत रीडिंग चष्मे वाटप करण्यात आले.

नागरिकांचा अतिशय उस्फुर्त आणि सकारात्मक प्रतिसाद होता. या शिबिराचे संयोजकांनी नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन चे आभार मानले.

You may have missed