May 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील गुडदे फौंडेशन तर्फे “नव निर्माण -४” उपक्रम

बालेवाडी :

राजाभाऊ गुडदे यांच्या ७५ व्या जन्मदिवसा निमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने आणि इंटेग्स क्लाऊड कंपनीच्या सहयोगाने “नव निर्माण -४” हा उपक्रम ठाकूर पिंपरी, राजगुरूनगर, पुणे येथे राबवण्यात आला. गावातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेत ११३ विद्यार्थ्यांना शालेय स्टेशनरी, शाळेसाठी स्पोर्टच्या किट (क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल) देण्यात आल्या. सामान्य ज्ञान विषयावर प्रश्नमंजुषा, मनोरंजनाचे विविध खेळ घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. शाळेच्या वतीने फाउंडेशन मधील आणि इंटेग्स क्लाऊड कंपनीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. इंटेग्स क्लाऊड कंपनीचे अनुष्का शुक्रे, मनीषा तायडे, दीपक कोटवे यांनी त्यांच्या कंपनीविषयी माहिती दिली आणि त्यांच्या हस्ते शिक्षकांना भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले.

 

या कार्यक्रमात गावात स्वछता अभियान करण्यात आले. गावातील मंदिर परिसरे स्वच्छ करण्यात आली, गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर स्वच्छ करून महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावाचे माजी सरपंच विकास ठाकूर, सरपंच मोनाली ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य शांताराम ठाकूर, जयहिंद युवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष मयूर ठाकूर तसेच सदस्य कमलेश ठाकूर, भानुदास ठाकूर, शुभांगी ठाकूर, शरद ठाकूर, सागर ठाकूर, सचिन ठाकूर यांचे सहकार्य मिळाले.

फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे तसेच सदस्य संगीत गुडदे, अनिमेश गुडदे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, अमोल बगडिया, शैलेश आपोतीकर, सौरभ राक्षे, आशा मालुसरे, गोरल गवारे, अश्विन अपराजित यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक श्री कोहिनकर सर, श्री अभंग सर, श्रीमती ठुबे मॅडम, श्री पगार सर यांचे सहकार्य लाभले.