April 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने रमजान ईद सरंजाम वाटप सोहळा उत्साहात संपन्न..

बाणेर:

बाणेर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक डॉ. दिलीपभाऊ मुरकुटे (पाटील), संस्थापक/अध्यक्ष: बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बाणेर, विश्वस्त: भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांच्या वतीने सचिन भाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद सरंजाम वाटप सोहळा उत्साहात पार पडला. खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

 

बाणेर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त सरंजाम वाटप करण्यात आले. तसेच, कार्यक्रम संपल्यानंतर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था देखील करण्यात आली होती. यावेळी ॲड. मानसी सुदाम मुरकुटे आणि ॲड रुची मेमाणे यांची वकील पदी निवड झाल्याबद्दल आणि गायनाचार्य हभप ओंकार जगताप महाराज यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार संजय जाधव यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हंटले की, आमचे शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांनी शिवसेनेचे संस्कार कसे आहेत हे लोकांची चूल पेटवून दाखवून दिले सामाजिक सलोखा कसा राखला जावा याचे आदर्श उदाहरण ईद सरंजाम वाटप करत दाखवले आहे.

आपल्या परीसरात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असुन ईद हा सण साजरा करता यावा रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना मदत म्हणुन सरंजाम वाटप करत सामाजिक सौहार्द वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शिवसैनिक डॉ. दिलीपभाऊ मुरकुटे (पाटील) (संस्थापक/अध्यक्ष: बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बाणेर, विश्वस्त: भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर)

यावेळी मौलाना ज. मोहम्मद जफर कासमी, मा. तानाजी निम्हण (नगरसेवक), मा. भानुदास पानसरे (शिवसेना समन्वयक पुणे), मा. ज्ञानेश्वर तापकीर (संस्थापक, अध्यक्ष: योगीराज ना.सह.प.), मा. बाळासाहेब भांडे (मा. सदस्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे विकास महामंडळ महाराष्ट्र शासन (राज्यमंत्री दर्जा)), मा. नामदेवराव गोलांडे (माजी सरपंच, म्हाळुंगे), प्रकाश भेगडे (शिवसेना जिल्हा प्रमुख) संतोष मोहोळ (संघटक) ॲड विशाल पवार, राजू शेडगे(चेअरमन), युवा नेते ओम बांगर, मा. शांताराम पाडाळे (मा. पोलीस पाटील, म्हाळुंगे), ॲड. मा. सुदाम मुरकुटे (नोटरी भारत सरकार), युवराज मुरकुटे (मा. चेअरमन, बाणेर ना. सह. पतसंस्था), मा. रखमाजी पाडाळे (प्रगतशिल शेतकरी), मा. सतीश रणवरे, मा. विकास भेगडे, मा. संजय बारावके, ह.भ.प. पांडुरंगअप्पा दातार (गुरुवर्य मृदुंगवादक), ह.भ.प. मधुकर निम्हण (राष्ट्रपती पुरस्कार विजेते), शशिकांत दर्शने (मा. चेअरमन, अथर्व बी सोसायटी), वसंतराव चांदेरे (मा. शाखाप्रमुख, सुसगाव), मा. अतुल अवचट (चेअरमन, अथर्व बी सोसायटी, बाणेर) आणि मा. सुनिल जाधव (सचिव, अथर्व बी सोसायटी, बाणेर), किरण मुरकुटे, सैपन शेख, मेहबूब शेख, शबीर सय्यद, संतोष भोसले, अविनाश गायकवाड, शिवकुमार नाईकवाडे, बाळासाहेब हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

You may have missed