सूस :
युवा नेते पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे यांनी आयोजित केलेल्या BBSM क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचा काल (दिनांक) पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेब, सौ. सरलाताई चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन पार पडले.
क्रिकेटच्या मैदानात सामाजिक एकतेचा रंग:
१२८ पुरुष संघ, ५८ महिला संघ आणि ३५०० हून अधिक खेळाडूंच्या सहभागासह ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा एक भव्य सोहळा ठरली आहे. या स्पर्धेने क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा अनोखा रंग भरला आहे.
बक्षीस रकमेत वाढ आणि लहान मुलांसाठीही स्पर्धा:
या उद्घाटन सोहळ्यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी स्पर्धेची बक्षीस रक्कम वाढवून महिला व पुरुष खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. तसेच, आयोजकांनी पुरुष व महिला खेळाडूंसोबतच लहान मुलांसाठीही स्पर्धा आयोजित करावी, अशी सूचना केली.
खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष:
कालच्या उद्घाटन समारंभात खेळाडूंच्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात BBSM क्रिकेट लीग 2025 ची ऊर्जा स्पष्टपणे दिसून आली. या क्रिकेटच्या महाउत्सवाला यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने अथक परिश्रम घेतले आहेत. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या सामन्यांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सामुदायिक बंध अधिक दृढ:
BBSM क्रिकेट लीगमुळे एक मोठे कुटुंब तयार झाले असून, सोसायटीमधील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत, निर्माण झालेलं हे आपुलकीचे नाते हेच या स्पर्धेचे यश आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सांगितले.



More Stories
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
महाळुंगे (पाडाळे) येथे “न्यू होम मिनिस्टर” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रियांका विनायक चिव्हे यांचा उपक्रम..
बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन.