May 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

खडकवासला ते वारजे जलवाहिनी दुरुस्ती : आज बाणेर, बालेवाडी, औंध सह शहराच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता..

पुणे :

खडकवासला ते वारजे डब्लू टी पी ला जाणाऱ्या फेज-टू रॉ वॉटर लाईनवर गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वारजे, शिवाजीनगर, औंध, बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खडकी, कर्वेनगरचा काही भाग येथील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

 

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजता पंपिंग बंद करण्यात येईल आणि सकाळी 6 वाजता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. हे काम दुपारी 1 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे.