April 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे येथील गोदरेज हिलसाईड व ग्रीन कोव्ह सोसायटीत अमोल बालवडकर यांची संवादयात्रा:

म्हाळुंगे:

म्हाळुंगे येथील गोदरेज हिलसाईड आणि ग्रीन कोव्ह सोसायटीतील नागरिकांशी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणी, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण यांसारख्या समस्या मांडल्या. बालवडकर यांनी या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

 

रस्ते आणि पाणीप्रश्न :

म्हाळुंगे-नांदे रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे बालवडकर यांनी सांगितले. तसेच, सुस-म्हाळुंगे भागासाठी सुरू असलेल्या २४x७ पाणीपुरवठा योजनेचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

इतर समस्या :

नागरिकांनी सोसायटीतील अपूर्ण रस्ते, बंद असलेले पथदिवे, कचरा संकलन, एस.टी.पी. प्लांट, गार्बेज पिट्स, वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण यांसारख्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. बालवडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

विकासकामांची माहिती :

बालवडकर यांनी महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत आणि बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेबाबत माहिती दिली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘अमोल बालवडकर फाऊंडेशन’च्या माध्यमातून ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल बालवडकर यांनी नागरिकांचे आभार मानले. तसेच, मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली आणि भविष्यातही विकासकामे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांनी ‘अमोल बालवडकर QRT TEAM’च्या माध्यमातून दैनंदिन समस्यांचे तात्काळ निराकरण होत असल्याचे कौतुक केले.

“प्रामाणिक काम, विकासावर ठाम!” या ध्येयाने काम करत असल्याचे अमोल बालवडकर यांनी यावेळी सांगितले.