औंधगाव :
औंधगाव येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती “एक गाव एक शिवजयंती” या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिला दिवस: शिव-शंभू विचारांचे व्याख्यान
शनिवार, १५ मार्च रोजी युवा व्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे यांचे “शिव-शंभू विचार” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला गावातील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दुसरा दिवस: भव्य रक्तदान शिबीर
रविवार, १६ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील शिवभक्त महिला व तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
तिसरा दिवस: भव्य मिरवणूक
सोमवार, १७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आणि आरती करून झाली. मिरवणुकीत मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि “जय भवानी जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीची शोभा वाढवत होता. मिरवणुकीची सांगता महाशिववंदनेने करण्यात आली.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन औंधगाव ग्रामस्थांनी केले होते.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी