बाणेर :
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 75% पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सौजन्याने आणि श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘रिजेन्सी क्लासिक’ आणि कुमार पिनॅकिन या सोसायटीला मोफत मेडिकल सर्जिकल किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनुप्रीय पुराणिक, दिनेश सौसान, शंतनू नकाडे, अतुल रोकडे, अभिषेक गंभीर धर्मेंद्र मौर्या, पुरुषोत्तम बेडेकर, विलीमा नंदन, सुमुख मेहकर, दीपा कुलकर्णी आणि सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.
गणेश कळमकर (सरचिटणीस : भाजपा पुणे शहर) यांनी सांगितले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करणे आवश्यक आहे. रिजेन्सी क्लासिक आणि कुमार पिनॅकिन सोसायटीने 75% पेक्षा अधिक मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे.”
गणेश कळमकर यांनी पुढे सांगितले की, “मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यास लोकशाही अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिक सक्रियपणे काम करतील.”
गणेश कळमकर यांनी रिजेन्सी क्लासिक आणि कुमार पिनॅकिन सोसायटी सोसायटीच्या नागरिकांचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यातही लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
More Stories
बालेवाडी येथे चैतन्य गायक कट्टा आयोजित राम नवमी निमित्त ‘गाते रहो बजाते रहो’ कार्यक्रम उत्साहात संपन्न..
छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा उत्साहात संपन्न : शंभूराजे क्रिकेट क्लब विजेता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा पुरस्कारामध्ये घोलप महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी