बाणेर :
आनंदवन जेष्ठ नागरिक संघ, मुरकुटे गार्डन यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या निमित्ताने रघूनाना कळमकर चौक ते मुरकुटे गार्डन अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या विशेष उपस्थितीत सर्व जेष्ठ नागरिकांनी पारंपरिक पोशाख आणि फेटे परिधान करून सहभाग घेतला. तसेच, शिवकालीन तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
शिवजयंतीच्या तिथीनुसार राहुलदादा बालवडकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भाऊ तापकीर यांनीही सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघ आणि अजय कदम सर (ACP) यांनी केले होते. संपूर्ण सोहळा अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी