बावधन :
बावधन येथे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी उपसरपंच दिपक दगडे पाटील यांच्या वतीने १७ मार्च ते २० मार्च या कालावधीत आधारकार्ड नोंदणी आणि पोस्ट ऑफिस योजनांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नवीन आधारकार्ड नोंदणी, आधारकार्डमधील बदल (पत्ता, मोबाईल नंबर, नाव) आणि आधारकार्डवरील फोटो बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची खाती उघडण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजना, रिकरिंग डिपॉझिट, पीपीएफ इत्यादी योजनांची माहिती आणि खाते उघडण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध असेल.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींसाठी पालक खाते उघडू शकतात. यासाठी पालकांचे केवायसी आणि मुलीचा जन्मदाखला आवश्यक आहे. या योजनेत केवळ २५०/- रुपये भरून खाते उघडता येते आणि ५०/- रुपयांच्या पटीत रक्कम भरता येते. आर्थिक वर्षात २५०/- ते १,५०,०००/- रुपये जमा करण्याची मर्यादा आहे. १५ वर्ष रक्कम भरल्यानंतर खाते २१ वर्षांनी परिपक्व होते. गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रक्कम आयकर अधिनियम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.
“नागरिकांना एकाच ठिकाणी आधारकार्ड आणि पोस्ट ऑफिस योजनांची सुविधा मिळावी, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
–दिपक दगडे पाटील(उपाध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मुलीचे आधारकार्ड आणि जन्मदाखला, आई किंवा वडिलांचे आधारकार्ड व पॅनकार्ड झेरॉक्स आणि आई किंवा वडिलांचे २ फोटो सोबत आणावेत.
शिबिराचा पत्ता: श्री दिपकदादा दगडे जनसंपर्क कार्यालय, अरिहंत कॉलेज समोर, उत्तमनगर, बावधन बु.
शिबिराची वेळ: सकाळी १० ते ५
संपर्क: ८५७५५५५०५०


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी