March 14, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथील कै.बाबुराव हबाजी सायकर (गणराज) चौक ते डेजी सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न…

बाणेर :

बाणेर येथील कै.बाबुराव हबाजी सायकर (गणराज) चौक ते डेजी सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन माजी नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर यांच्या मागणीला यश आल्याने नुकतेच पार पडले.

 

या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. या रस्त्यामुळे बेनेकेअर हॉस्पिटल आणि डेजी सोसायटीमधील लोकांना ये-जा करणे सोपे होणार आहे. परिसरातील नागरिकांनी सौ. ज्योतीताई कळमकर यांच्या प्रयत्नांचे आणि पाठपुराव्याचे कौतुक केले आहे.

“बाणेरमधील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे नागरिकांची ये-जा करणे सोपे होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील.”
– माजी नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर

या कार्यक्रमाला भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री गणेश कळमकर, विकास कुलकर्णी, मंदार शहाणे, विशाल बोरा, वैभव कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी, गिरीश पेडणेकर, मिलिंद काटेकर, प्राजक्ता काठीकार, वृषाली कुलकर्णी, शीतल पेडणेकर, प्रीती शहाणे, कैलास काबरा, किरण सायकर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.