May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी राहुलदादा बालवडकर यांच्याकडून पत्र्याचे शेड उभारण्यासाठी आर्थिक मदत..

बालेवाडी :

बालेवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी उदार हाताने आर्थिक मदत केली आहे. मंदिर परिसरात पत्र्याच्या शेडच्या कामासाठी त्यांनी १ लाख रुपये आणि तुकाराम बीज दिवशी आयोजित अन्नप्रसाद कार्यक्रमासाठी ५१,००० रुपये अशी एकूण १,५१,००० रुपयांची मदत मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली. या योगदानामुळे मंदिराच्या सुविधा सुधारण्यास आणि भक्तांच्या सोयीसाठी मोठी मदत होणार आहे.

 

“श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बालेवाडीतील श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराच्या विकासासाठी आणि भक्तांच्या सुविधेसाठी माझ्या परीने थोडेसे योगदान देणे हे माझे कर्तव्य आहे. समाजसेवा आणि धार्मिक कार्याला पाठिंबा देणे ही माझी बांधिलकी आहे.”
राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टने राहुलदादा बालवडकर यांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांनीही कौतुक केले आहे. यावेळी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.