May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील सर्वे नंबर ३३ महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण; ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नांना यश

बाणेर :

बाणेर येथील सर्वे नंबर ३३ मध्ये साहिल शिरीन, रिजेंट पार्क, ओलीव्ह हिल्स यांसारख्या अनेक सोसायट्यांना जोडणारा मालपाणी ॲजाइल इमारती शेजारील रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज (दिनांक) कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नांमुळे झाले.

 

या भूमिपूजन सोहळ्याला डॉ. जनार्दन श्री. गणेश कळमकर, कदम, निलेश थोरात, राजेंद्र पाटसकर, मनीष आंबरे, किरण सायकर, शिवांजली कळमकर, प्रवीण जाधव, संजय ताम्हाणे, विजय जोशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

या वेळी बोलताना ज्योती कळमकर म्हणाल्या, “हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या डांबरीकरणामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल. या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते.”