May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

एस.के.पी. शाळेजवळील समिक्षा वाईन शॉपवर कारवाईची शिवम बालवडकर यांची मागणी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बालेवाडी :

एस.के.पी. शाळेजवळ असलेल्या समिक्षा वाईन शॉपवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाळेच्या परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी बालेवाडी पोलिस स्टेशन चे पी आय नवनाथ जगताप यांना निवेदन दिले आहे.

 

बालवडकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, “हे दुकान अनेक वर्षांपासून नागरिक आणि शालेय मुलांसाठी अडचणीचे कारण ठरत आहे. लोक दुकानातून मद्य खरेदी करून रस्त्यावर आणि शाळेच्या आसपास पितात. त्यामुळे शाळेतील मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. मुलांना शाळेत जाताना अशा वातावरणात जावे लागते, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मद्यपान करणारे लोक अश्लील भाषेचा वापर करतात आणि अयोग्य वर्तन करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.”

या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी बालवडकर यांनी केली आहे. वाईन शॉपवर योग्य कारवाई केल्यास विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार होईल, तसेच नागरिकांनाही दिलासा मिळेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पी आय जगताप साहेब यांनी देखील तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासनll दिले आहे.