May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

BBSM महिला क्रिकेट लीग 2025: जागतिक महिला दिनानिमित्त महिला खेळाडूंचा लकी ड्रॉ पद्धतीने स्पर्धेतील लॉट्स (भाग्यपत्रिका) पाडत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..

सूस :

BBSM (बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे) आयोजन समितीच्या वतीने काल, 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून BBSM क्रिकेट लीग स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडूंच्या स्पर्धेच्या खेळाडूंसोबत लकी ड्रॉ पद्धतीने स्पर्धेतील लॉट्स (भाग्यपत्रिका) निश्चित करण्यात आले. याचे आयोजन सूस येथील ‘फिट अँड फोकस्ड क्रिकेट टर्फ’ मैदानावर करण्यात आले होते.

 

BBSM आंतरसोसायटी क्रिकेट लीग 2025 ची तयारी सुरू झाली असून, यंदा बाणेर, बालेवाडी, सूस आणि म्हाळुंगे भागातील 56 महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.

BBSM मध्ये महिला क्रिकेटला मिळत असलेला प्रतिसाद पाहून खूप प्रेरणा मिळते. ही केवळ एक स्पर्धा नसून, महिलांच्या आत्मविश्वास आणि क्रीडा कौशल्याचा सन्मान आहे, असे मत BBSM चे मुख्य आयोजक समीर चांदेरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला BBSM चे मुख्य आयोजक समीर चांदेरे, पुरुष आयोजन समितीचे अध्यक्ष अमोल भोरे, कार्याध्यक्ष रमेश धनगर, उपाध्यक्ष शिवांकुर जगताप, मोहित माने, महेंद्र भांबरे, सचिव सतीश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, अभिजित बाजारी तसेच महिला आयोजक समितीच्या अध्यक्षा पूजा चांदेरे, कार्याध्यक्षा सना शेख, उपाध्यक्षा अश्विनी रामटेके, सचिव प्रीती हिरेमठ, सदस्या कोमल महाले, ज्योती सिंग तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुदीप पाडाळे आणि कुणाल काटे यांनी केले.

You may have missed