बाणेर :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाणेर बालेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये समाजातील महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये राहुल दादा बालवडकर यांनी सहभाग घेतला.
बाणेर येथील सायकर उद्यानात “नवचैतन्य हास्य क्लब” यांच्या वर्धापन दिन व महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भीमनगर येथे “रमामाता महिला मंडळा”च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंडळासाठी साउंड सिस्टीम भेट देण्यात आली, ज्यामुळे पुढील कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.
याशिवाय, “चैतन्य गायक कट्टा”च्या वतीने राहुल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालय, बालेवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये API ऋतुजा जाधव मॅडम, PI शैला पाथरे मॅडम, श्री. विठ्ठल काटे सर, सौ. ज्योतीताई राहुल बालवडकर, सौ. स्वप्नालीताई सायकर, सौ. ज्योतीताई कळमकर, सौ. पुनमताई विधाते, सौ. रूपालीताई बालवडकर, सौ. शितलताई बर्गे मॅडम आणि इतर सभासद यांचा समावेश होता.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन