पिरंगुट :
“नवा उजाळा, नव्या स्वप्नांची वाटचाल!”
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पिरंगूट शाखेत आज गुरुवार दिनांक ५ मार्च २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागातील सिनिअर केजी चा पदवी वितरण समारंभ – आनंदाचा सोहळा!
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सिनिअर केजी च्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ आज शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एका अविस्मरणीय क्षणाची अनुभूती दिली.
समारंभाची सुरुवात सरस्वती पूजन करून ज्ञानदेवतेचा आशिर्वाद घेऊन दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विशेष अतिथींचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या उपस्थितीने समारंभ अधिक दैदिप्यमान झाला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यासाठी “आमचा वर्षभराचा अभ्यासक्रम” हा भाग सादर करण्यात आला. नंतर, चिमुकल्यांनी दिलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे प्रमाणपत्र वितरण, जिथे लहानग्यांनी आपल्या सिनिअर केजी पदवी प्रमाणपत्र मोठ्या आनंदाने स्वीकारले. पूर्व प्राथमिक विभाग प्रशिक्षण पूर्ण झाल्याची व प्राथमिक विभागात पाऊल ठेवण्याची ही ग्वाही. पालकांनीही आपल्या अनुभवांना वाट मोकळी करून पालकांच्या प्रतिक्रिया सत्रात मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य सौ निर्मल पंडीत यांनी हा केवळ समारंभ नसून विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतलेल्या कष्टाचे व मेहनतीची ग्वाही असून असेच सहकार्य लाभावे असे सांगून प्राथमिक विभागात सर्वांचे स्वागत केले. तसेच संचालिका सौ रेखा बांदल मॅडम यांनी सर्व मुलांच्या व पालकांच्या उपस्थितीला दाद देऊन हे सर्व मुले निरागस असून त्यांना घडवण्याचे काम शिक्षकवृंद करीत असून सर्वांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी भाषण देऊन शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या शानदार सोहळ्याच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सर्वांच्या मेहनतीची प्रशंसा केली.
कार्यक्रमाची सांगता ही कृतज्ञता प्रदर्शन (व्होट ऑफ थॅंक्स) ने करून करून समारंभाचा समारोप करण्यात आला . व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका पूनम पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख पल्लवी नारखेडे, इंदू पाटील व सना इनामदार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली ओंबासे आणि सीमा कांबळे यांनी केले.
या शानदार पदवी वितरण समारंभाने एका सुंदर प्रवासाची सांगता केली आणि नव्या स्वप्नांना नवे पंख दिले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पहिली शैक्षणिक पायरी यशस्वीपणे पार केली आहे, आणि आता त्यांच्या आयुष्याचा हा नवा अध्याय ज्ञान, कौशल्य आणि यशाच्या प्रकाशाने उजळू शकतो.
पालकांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ही छोटी रोपटी आता मोठ्या वृक्षांप्रमाणे फोफावतील! समोर उभ्या असलेल्या अनंत संधींचा लाभ घ्या, नवे ज्ञान मिळवा आणि आपल्या स्वप्नांना आकाशाइतकी मोठी झेप द्या! असे प्रतिपादन संचालिका रेखा बांदल यांनी सर्वाँना केले.
More Stories
बालेवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनचा मदतीचा हात!
बाणेरमध्ये भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने भारतीय सैन्याच्या विजयाचा जल्लोष!
‘सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू..प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती