बाणेर :
बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन (BMA), MOC कॅन्सर केअर सेंटर आणि विज्डम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आशा वर्कर्स आणि गृह सहाय्यिकांसाठी मोफत मॅमोग्राफी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या शिबिराचा ४० महिलांनी लाभ घेतला.
उद्घाटनप्रसंगी BMA अध्यक्ष डॉ. कविता चौधरी यांनी सर्व आशा वर्कर्सचे स्वागत करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. BMA सोशल सेक्रेटरी डॉ. दीपाली झंवर यांनी मोबाईल मॅमोग्राफी शिबिराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, आरोग्य व्यवस्थेच्या कणा असलेल्या आशा वर्कर्ससाठी हे शिबिर उपयुक्त आहे.
ऑंकोलॉजिस्ट डॉ. मंगेश मेखा यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता आणि मॅमोग्राफीबाबतच्या समज-गैरसमजांवर मार्गदर्शन केले. BMA संस्थापक डॉ. राजेश देशपांडे यांनी पुणे जिल्हा पातळीवर हे शिबिर राबविण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून अधिकाधिक महिलांना लाभ मिळेल.
डॉ. मंगेश मेखा आणि विज्डम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सूरज चव्हाण यांचा सत्कार, तसेच सर्व आशा वर्कर्सचा गौरव BMA सदस्यांकडून करण्यात आला. BMA सोशल चेअरमन डॉ. सागर सुपेकर यांनी आभार प्रदर्शन केले, तर डॉ. बाळाजी सदाफळे यांनी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी BMA सचिव डॉ. सुषमा जाधव, खजिनदार डॉ. बाबन साळवे, डॉ. सुवर्णा साळवे, डॉ. तेजस्विनी भाले, डॉ. समीर भाले, डॉ. लता पोहोरे, डॉ. हरीश सोनार आणि डॉ. (सौ.) सुपेकर उपस्थित होते.
“स्त्रियांच्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल – लवकर निदान, उज्ज्वल भविष्य!”



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले