बालेवाडी :
भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाला युवक-युवतींनी उदंड प्रतिसाद दिला. या महोत्सवात अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
या उपक्रमाबद्दल बोलताना शिवम बालवडकर म्हणाले, “युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा छोटासा प्रयत्न असावा, या उद्देशाने हा नोकरी महोत्सव आयोजित केला. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवत राहण्याचा माझा मानस आहे.”
महोत्सवात मुलाखती आणि करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तरुणांना नोकरीच्या संधींसह त्यांच्या कौशल्यांना दिशा देण्याची संधी मिळाली. या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शिवम बालवडकर यांनी सर्व सहभागी तरुणांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
हा नोकरी महोत्सव युवकांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी