सुस :
रावी नगर, सूस येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या ड्रेनेज समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. पावसाळ्यात साचणारे पाणी, दुर्गंधी आणि वाढत्या आरोग्य समस्यांमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त होते. या समस्येवर तातडीने लक्ष घालून मा. बाबूराव चांदेरे साहेबांनी नवीन ड्रेनेज लाईनसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला.
आज मा. बाबूराव चांदेरे साहेबांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती होती.
“रावी नगरमधील नागरिक अनेक महिन्यांपासून ड्रेनेज समस्येला सामोरे जात होते. नवीन ड्रेनेज लाईनमुळे परिसरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल. या कामासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्याबद्दल मा. बाबूराव चांदेरे साहेबांचे मनःपूर्वक आभार!” – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी