May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना औक्षण करून व दही साखर देऊन आत्मविश्वासाने परंपरा जपत परीक्षेसाठी केले सज्ज ….!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या सूस, बावधन व पिरंगुट शाखेतून सुमारे 350 विद्यार्थी आज इयत्ता 10 वी च्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी संपूर्ण आत्मविश्वासाने सज्ज होते.

 

परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम हीच विद्यार्थ्यांची कहाणी आहे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला पेपर त्यामुळे सारे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले होते विद्यार्थ्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित ,पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे तसेच वर्गशिक्षिका योगिता धाने आणि स्मिता श्रीवास्तव यांच्या हस्ते परीक्षा हॉलवर जाताना विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले. व दही साखर देऊन परीक्षेसाठी सज्ज केले. जर कोणाच्या मनात भीती असेल तर ती भीती न बाळगता परीक्षेचा पेपर लिहिण्यास कसे सामोरे जायचे त्याबद्दल त्यांची भीती घालवण्यात आली. परीक्षागृहामध्ये जाण्यापूर्वीच्या सर्व योग्य सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसाठी शाळेमधूनच परीक्षा केंद्र पिरंगुट पर्यंत बस ठेवण्यात आली म्हणजे सर्व विद्यार्थी वेळेवर परीक्षेला पोहोचतील आणि तेथे गेल्यानंतर त्यांची घाबरगुंडी होणार नाही तसेच परीक्षेचा पेपर झाल्यानंतर पुन्हा बस विद्यार्थ्यांना उपलब्ध होती. सूस ते पिरंगुट या दरम्यान सार्वजनिक बस सेवा खूप कमी आहे व 1 तासाने बस येते ही अडचण लक्षात घेवून परीक्षेला त्यामुळे उशीर नको म्हणून शाळेने दररोज परीक्षाकेंद्रापर्यंत व पेपर संपल्यावर परीक्षा केंद्रापासून शाळेपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित या स्वतः पिरंगुट परीक्षा केंद्रावर जातीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व आत्मविश्वास येण्यासाठी हजर होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागा नवीन असली तरीही दडपण न येता सर्व विद्यार्थी आनंदाने परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले.

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाताना शाळेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांनी “तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, तुमचे कठोर परिश्रम योग्य दिशेने लावा. परीक्षेसाठी तयार रहा आणि तुमचा आत्मविश्वास मजबूत करा. तुमचे कठोर परिश्रम ही तुमच्या यशाची सर्वोत्तम गुरुकिल्ली आहे!” असा संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिला.

संपूर्ण आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल तसेच शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण व पालकवर्ग यांच्या सहयोगाने दहावीचे विद्यार्थी आज प्रथम पेपरसाठी आत्मविश्वासाने परीक्षेसाठी सज्ज झाले.

विद्यार्थ्यांचा एवढा विचार करून व पालकांच्या विनंतीची दखल घेवून शाळेने परीक्षा केंद्रापर्यंत दररोज बससेवा उपलब्ध करून दिल्याबद्द्ल सर्व पालकवर्गाने संस्थाप्रमुखांचे व मुख्याध्यापिका सौ पंडित मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानले.